‘स्वर्णरेखा’ नदी,लोक दररोज नदीकाठी सोनं गोळा करतात, आजही शास्त्रज्ञांसाठी एक रहस्य

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

 

भारतात अनेक नद्या वाहतात, यातील प्रत्येक नदीची स्वतःची खासियत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात 400 हून अधिक लहान-मोठ्या नद्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, आपल्या देशात अशी एक नदी आहे, जी पाण्यासोबत सोनंही बाहेर वाहून आणते.

स्थानिक लोकं रोज या नदीचे पाणी गाळून सोनं काढतात आणि ते विकून आपली घरे चालवतात.

या नदीचे नाव ‘स्वर्णरेखा’ नदी असे आहे. अगदी नावाप्रमाणेच नदी पाण्यासोबत सोनंही देते. ही नदी झारखंडमध्ये वाहत असून, ही येथील स्थानिक लोकांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. येथील लोक दररोज नदीकाठी जाऊन पाणी गाळून सोनं गोळा करतात. झारखंडच्या तामार आणि सारंडा सारख्या भागात शतकानुशतके हे लोक नदीतून सोनं काढण्याचे काम करत आहेत.

स्वर्णरेखा नदीचा उगम झारखंडची राजधानी रांचीपासून 16 किमी अंतरावर झाला आहे. ही नदी झारखंडमधून सुरू होऊन पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वाहते. या नदीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे झारखंड सोडल्यानंतर ही नदी इतर कोणत्याही नदीत मिसळत नाही, तर थेट बंगालच्या उपसागरात जाते.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, शेकडो वर्षांनंतरही या नदीत सोनं वाहण्याचे कारण वैज्ञानिकांना कळू शकलेलं नाही. म्हणजेच या नदीचं सोनं आजही शास्त्रज्ञांसाठी एक रहस्य आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, ही नदी खडकांमधून फिरते आणि त्यामुळे सोन्याचे कण त्यात येतात. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

याशिवाय आणखी एका नदीतही सोन्याचे कण सापडले आहेत. ही नदी स्वर्णरेखाची उपनदी आहे. या नदीचे नाव ‘करकारी’ नदी आहे. करकरी नदीबद्दल लोक म्हणतात की, स्वर्णरेखातूनच काही सोन्याचे कण या नदीत येतात. स्वर्णरेखा नदीची एकूण लांबी 474 किमी आहे. पण, या नदीतून सोनं काढण्याचे काम सोपे नाही. सोने गोळा करण्यासाठी लोकांना दिवसभर कष्ट करावे लागतात.

इथला माणूस एका महिन्यात 70 ते 80 सोन्याचे कण गोळा करू शकतो. म्हणजेच, दिवसभर काम केल्यानंतर, सामान्यतः एखादी व्यक्ती फक्त एक किंवा दोन सोन्याचे कण काढू शकते. एक सोन्याचा कण विकून 80 ते 100 रुपये मिळतात, असे स्थानिक लोक सांगतात. यानुसार लोकांना महिन्याला फक्त 5 ते 8 हजार रुपये कमावता येतात.