उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचं नाव शिवसेना ऐवजी “शिल्लक सेना” करून घ्यावं – खोपकर

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुंबई : एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 50 आमदार घेऊन गेल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. यावरुन आता मनसेने शिवसेनेवर खोचक शब्दात टीका सुरू केली आहे

शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हेदेखील गुवाहाटीला रवाना झाले. सकाळपासून सामंत नॉट रिचेबल होते. त्यानंतर उदय सामंत सूरतमार्गे गुवाहाटीला केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. ANI या वृत्त संस्थेनेही याबाबत ट्विट केले आहे. तसेच, सामंत यांचे विमानातील फोटोही समोर आले आहेत. त्यावरुन, आता मनसेने शिवसेनेला टोला लगावला आहे. ‘थेट पक्षप्रमुखांनाच केलं नापास, उतरवला शिवसेनेचा गणवेष, उच्च शिक्षणमंत्र्यांनी घेतला गुवाहाटीच्या शिंदे कॉलेजमध्ये प्रवेश’, असे ट्विट खोपकर यांनी केले होते.

त्यानंतर आता खोपकर यांनी अजून दोन ट्विट करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर दिली होती.पण. “बाबा ओरडतील!” म्हणून नाही आला,’ असे ट्विट करत खोपकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. याशिवाय, ‘एकनाथ शिंदेंसोबत इतके आमदार निघून गेले आहेत की, उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचं नाव शिवसेना ऐवजी “शिल्लक सेना” करून घ्यावं…’ असा टोलाही खोपकर यांनी दुसऱ्या ट्विटमधून लगावला आहे.