हवामान खात्याचा ईशारा, पुढचे पाच दिवस ‘या’ भागात दमदार पाऊस
मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने थैमान घातले असून, शहराच्या तुलनेत उपनगरात बरसणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे पडझडीच्या घटनाही घडत असून, शुक्रवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास मुंबईत ९० मिलीमीटर एवढ्यापावसाची नोंद झाली असून, शनिवारीही मुंबईत माध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट
अकोला व वाशिम जिल्ह्यात आर्द्रा नक्षत्रात पाऊस रिमझिम झाला त्यानंतर पावसाने मात्र दडी दिल्याने बळीराजाच्या नजर पुन्हा आकाशाकडे खिळल्या आहे. हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असून, जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली
कोकणात ऑरेंज अलर्ट
कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी माध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी दमदार पाऊसचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने पुढील दोन ते तीन दिवस कोकणातील रत्नागिरी, रायगड, आणि सिंधुदुर्गातील काही ठिकाणी मध्य महाराष्ट्रातील घाट भागातील ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.