ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

पुणे: शेगावसाठी अकोला विमानतळ सुरू करा! मुख्यमंत्र्यांकडे मागणी


पुणे: शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विमानसेवा अथवा इतर वाहतुकीचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे अकोला येथील शिवनी विमानतळ कार्यान्वित करावे, अशी मागणी हवाई वाहतूकज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत वंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गजानन महाराजांच्या समाधी स्थळाबरोबरच प्रसिद्ध लोणार सरोवर, आनंद सागर व इतर पर्यटन स्थळे असलेल्या शेगाव, अकोलामध्ये आवश्यक पायाभूत सुविधा व दळण-वळणाची योग्य व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. यातून रोजगार निर्मितीबरोबरच महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, कृषी व पर्यटन क्षेत्रात भर पडेल.
शेगावजवळील अकोला विमानतळ लवकरात लवकर फोरसी श्रेणीत अद्ययावत करून तेथून केंद्र सरकारच्या सहकार्याने ‘उडान’ हवाई सेवा सुरु करावी. शेगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सेवा पुरवाव्यात. स्थानकाची सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि पुणे तसेच मुंबईतून शेगावपर्यंत किमान एक वंदे भारत रेल्वे सुरु करावी, अशी मागण्याही वंडेकर यांनी केल्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button