महत्वाचेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

तलाठी तात्यांपासून साहेबापर्यंतच्या दलालीला बसणार चाप; महसूल विभागात लागू होणार ही नवी यंत्रणा


 

मुंबई – सरकारी काम आणि सहा महिने थांब, ही म्हण अनेकांना माहिती आहे. सरकारी कार्यालयात खाऊगिरीशिवाय कुठलेही काम पुढे सरकत नाही, ही वास्तविकता आहे. विशेषत: महसूल भागात तर पैशाची देवाणघेवाण सर्रास होते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील दलालीवर आळा बसविणारी नवीन यंत्रणा आणण्यात आली आहे. या प्रणालीचे नाव फिफो असे आहे.

दलाली प्रवृत्तीचर समुळ लाश करण्याच्या उद्देषाने राज्याभरात ‘फर्स्ट इन फर्स्ट आउट’ म्हणजेच फिफो प्रणाली वापरण्याचा निर्णय महाआयटीकडून घेण्यात आला आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे आता प्रमाणपत्र मिळणे सोयीचे होणार आहेच. परंतु, सामान्य नागरिकांची दलालांपासून मुक्तता होणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून प्रथम अर्ज करण्यात आलेल्या व्यक्तीचे काम आधी करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात ही प्रणाली लागू करण्यात आली असून वर्ध्यात देखील त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

फिफो प्रणालीनुसार तारिख आणि वेळेनुसार प्रथम येणारा अर्ज स्वीकारला किंवा नाकारला जाणार आहे. क्लार्क, अव्वल कारकून अथवा नायब तहसिलदार आणि तहसिलदार अथवा उपजिल्हाधिकारी अशा तीन टप्प्यामधून प्रमाणपत्राचे अर्ज पुढे जात असतात. फिफो प्रणालीमुळे कुणालाही अतिरिक्त पैसे देण्याची गरज पडणार नाही. आधी आलेल्या अर्जावर आधी विचार आता करण्यात येणार आहे. फिफो प्रणालीमुळे प्रमाणपत्र मिळण्याची पद्धत तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे चित्र आहे.

सामान्यांमधील गैरसमज दूर होणार
आपले सरकार या संकेतस्थळावर अथवा ऑनलाइन सरकारी केंद्रावरून प्रमाणपत्रासाठी अर्ज केला जातो. विविध डेस्कच्या माध्यमातून हे अर्ज निकाली काढण्यात येतात. याआधी अर्ज केल्यावर प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होत होता. आधी अर्ज केला असताना देखील मधल्याच माणसाला प्राधान्य मिळायचे. दलाल प्रवृत्तीमुळे नंतर केलेला अर्ज देखील निकाली लागत होता. दलाला मार्फतच काम लवकर होते, अशी समज नागरिकांची झाली होती. सामान्यांमधील हा गैरसमज फिफोमुळे दूर होणार आहे.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button