शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

एकनाथ शिंदे (eknath shinde shivsena)हे अपक्ष आमदारांसह शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटी (eknath shinde in guwahati) येथील एका हॉटेलमध्ये गेले आहेत. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi) सरकार धोक्यात असल्याचे दिसून येत आहेत. गुवाहाटी येथील ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. त्या हॉटेल बाहेर मोठा पोलीस (police protection) फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार माझ्यासोबत आहेत अजून आमदार माझ्यासोबत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन येथे महाराष्ट्रातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. दरम्यान शिंदे काल सुरत येथील एका हॉटेलमध्ये राहिले होते. महाराष्ट्र आणि गुजरात लागून राज्ये असल्याने महाराष्ट्रातील काही नेते एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी येत असल्याने त्यांनी गुवाहाटी येथे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. शिंदे ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या हॉटेलबाहेर cisf चे जवान तैनात करण्यात आले आहेत. या हॉटेलला चारही बाजूंनी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.