ताज्या बातम्यामहाराष्ट्र
परभणीत मोठी दुर्घटना; शौचालयाच्या हौदात बुडून पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू

सोनपेठ: दहिखेड शेत शिवारात असणाऱ्या एका शेतातील आखाड्यावर शौचालयाच्या हौदाची स्वच्छता करण्यासाठी गेलेले सहा मजूर हौदात बुडाले. त्यापैकी पाच जणांचा बुडून जागीच मृत्यू झाला तर, एक जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. सोनपेठ तालुक्यातील भाऊचातांडा शिवारात असलेल्या एका शेतात सेफ्टी टँकचं सफाईचं काम करत असताना पाच जणांचा टँकमध्ये बुडून गुदमरून मृत्य झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाल्याचं समजतं. ही घटना काल रात्री दहाच्या सुमारास घडली. काल सहाजण दुपारी तीनपासून ह्या शौचालयाच्या सेफ्टी टँकची स्वच्छता करत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
मयत झालेले मजूर
1) शेख सादेक (वय 45)
2) शेख सादेकचा मुलगा शेख शाहरुख (वय 19)
3) शेख सादेकचा जावई शेख जुनेद (वय 29)
4) शेख नवीद (वय 25)
5) शेख नवीदचा चुलत भाऊ शेख फिरोज (वय 19)