ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

रुग्णांना फळे व सहारा आणाथालयात शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून स्वाभिमानी दिन केला साजरा


रुग्णांना फळे व सहारा आणाथालयात शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून स्वाभिमानी दिन केला साजरा

गेवराई : दिनांक 10 5 2023 रोजी मंगळवार या दिवशी वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने वंचित तालुकाध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयरुग्णांना फळे वाटप व सहारा अनाथालयात बालग्राम येथील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून देशाचे स्वाभिमानी नेते माजी खासदार एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी दिवस साजरा करण्यात आला
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव किशोरजी भोले यांनी सूत्रसंचालन केले अनेक मान्यवरांनी माजी खासदार एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले यावेळी गरजवंतांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मदत करून अडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहून वंचितांना न्याय देऊ माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी विचाराला प्रभावीपणे जनमानसात रुजवण्यासाठी अहोरात्र प्रमाणिकपणे कष्ट करू असे कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोणतेही बॅनरबाजी न करता गरजू वंचितांना मदत करून वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात स्वाभिमानी दिवस म्हणून गेवराई तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे गेवराई शहराध्यक्ष दस्तगीर शेख अजय खरात राजू गायकवाड बाजीराव बाबर डीपीआयचे नेते नामदेव भिसे ज्ञानेश्वर हवाले सुबोध कांडेकर यांच्यासह इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button