
मुंबई : कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपासून आपल्याला कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. यामध्येच आता मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येची झपाट्याने वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे.मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने दोन हजाराचा आकडा पार केला आहे. सध्या रुग्णालयाध्ये ५८७ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
मुंबईमधील रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोना बाधितांचे प्रमाण १६ टक्क्यांवर गेले आहे. रुग्णालयांमध्ये सध्या सुमारे ११ हजार खाटा उपलब्ध असून त्यातील पाच टक्के खाटा व्यापलेल्या आहेत. आठवडाभरापूर्वी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांनाचे प्रमाण हे तीन टक्के होते. रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे गंभीर रुग्णांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.