
अहमदाबाद : गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील प्रसिद्ध महाकाली मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारंपरिक भगवा ध्वज फडकावण्यात आला.तब्बल 500 वर्षांनी महाकाली मंदिरावर हा भगवा ध्वज फडकला आहे. महाकाली मंदिरावर बनवण्यात आलेला दर्गा त्याची सेवा करणाऱ्यांच्या सहमतीने तिथून हलवण्यात आला. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पावागड मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला.
हा शिखर ध्वज केवळ आमची आस्था आणि आध्यात्माचं प्रतिक नाही. तर हा शिखर ध्वज शतकं बदलतात, युगे बदलतात, पण श्रद्धेचे शिखर चिरंतन राहतं याचंही प्रतिक आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.