अंदाधुंद गोळीबार, सात जणांचा मृत्यू..

अमेरिका : अमेरिकेतील एक राज्य असलेल्या मेक्सिको येथे अज्ञाताने गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका मुलाचा समावेश आहे. त्याखेरीज एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या गोळीबारानंतर वॉटर पार्कमध्ये गोंधळ उडाला. लोकांमध्ये दहशत निर्माण झाली. पोलीस ताबडतोब तिथे पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. हल्लेखोर गोळीबारानंतर फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या हल्ल्यातील बळींमध्ये सात वर्षांच्या मुलासह तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
दुर्घटनेनंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत लोक पळताना दिसत आहेत. भीतीने आरडाओरडा देखील करत आहेत. मेक्सिको पोलीस आणि तेथील सैनिक हेलिकॉप्टरच्या मदतीने हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !