Video:चार वर्षांच्या मुलाच्या पोटात हनुमान, नांदेडचे डॉक्टर बनले ‘संकटमोचक’

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नांदेड : नांदेडमध्ये एका चार वर्षांच्या मुलाने थेट हनुमानच गिळला.

मुलाने खेळता खेळता हनुमानाची धातूची तीन सेंटीमीटरची मूर्ती गिळली. ही मूर्ती बालकाच्या अन्ननलिकेत अडकली, अखेर डॉक्टरच या मुलासाठी संकटमोचक ठरले.

 

हिंगोलीमधल्या चार वर्षांच्या मयूर वहावळ या बालकाने त्याच्या गळ्यात बांधलेली हनुमानाची मूर्ती गिळली. अन्ननलिकेत मूर्ती अडकल्याने त्याला श्वास घेणं अवघड झालं होतं. यासंमधीचे व्रत न्युज लोकमत ने दिले आहे.

मुलाने मूर्ती गिळल्याचं लक्षात आल्यानंतर त्याच्या घरच्यांनी लगेच त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी मुलावर शस्त्रक्रिया न करता मूर्ती काढल्यामुळे मुलाला जीवनदान मिळालं. अनेक पालक लहान मुलांच्या हातात किंवा गळ्यात काही वस्तू बांधतात, पण हातातली वस्तू तोंडात टाकण्याची सवय लहान मुलांना असते, यातूनच हा प्रकार घडण्याची शक्यता असते.