
बीड : बीड जिल्ह्य़ातील जिल्हापरिषद शाळांची दुरावस्था व त्याकडे जिल्हाप्रशासनाचा हलगर्जीपणा शाळेतील वर्गखोल्याची दुरावस्था,जीर्ण झालेल्या शाळेत भरणारे वर्ग शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जिविताशी खेळत असुन पावसाळ्यात दुर्घटना घडण्याचा धोका लक्षात घेता तसेच काही शाळा ईमारत नसल्यामुळेच उघड्यावर भरतात तर काही शाळांमध्ये मुलामुलींना शौचालये आस्तित्वातच नाहीत त्यामुळेच जिल्हाप्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा बदल सुधारणा न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.६ जुन सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाप्रशासनाच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,
शेख मुबीन यांनी जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद,प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री,शालेय शिक्षण मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड,विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना दिले असून निवेदनाद्वारे
बीड जिल्ह्य़ातील जिल्हापरिषदेच्या २६४ शाळांमधील ४६० वर्गखोल्या धोकादायक असून पावसाळ्यात दुर्दैवी घटना टाळण्यासाठी तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी तसेच स्वच्छतागृहाची अवस्था बिकट असून तात्काळ उपाययोजना करण्यात येऊन जुन्या व पडझड होत असलेल्या वर्गखोल्यांची तात्काळ दुरूस्ती व उद्याची भावी पिढी घडवण्यासाठी शाळांची दर्जेदार ईमारत व वर्गखोल्यांची उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्य़ातील २६४ शाळांमधील ४६० वर्गखोल्या धोकादायक
______
बीड जिल्ह्य़ातील २६४ शाळांमधील ४६० वर्गखोल्या धोकादायक असुन यात अंबाजोगाई तालुक्यातील ३१ ,आष्टी ५५, बीड ६८ ,धारूर ३१ ,गेवराई ६५,केज २९ ,माजलगाव २५ ,परळी २८ ,पाटोदा ५५ ,शिरूर ४४ ,वडवणी २९ तालुक्यातील
शाळांमधील १५६ एक वर्गखोली,११२ दोन वर्गखोल्या,९६ तीन वर्गखोल्या,५२ चार वर्गखोल्या,१५ पाच वर्गखोल्या, १२ सहा वर्गखोल्या,८ आठ वर्गखोल्या,९ नऊ वर्गखोल्या अशा एकुण ४६० वर्गखोल्या जीर्ण झालेल्या आहेत.
सामाजिक न्याय मंत्र्यांच्या जिल्ह्यात शाळेतील मुला-मुलींना शौचालयच नाही विशेष सहाय्य तर दुरच
___
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांच्या बीड जिल्ह्य़ातील
जिल्हा परीषदेच्या ४३७ शाळांमध्ये मुलांचे स्वच्छतागृह नाही तर २७५ शाळांमध्ये मुलींचे स्वच्छतागृह नाही तसेच मुलांचे १६६ आणि मुलींचे ११५ स्वच्छतागृहे वापरात नाहीत.
कर्तव्यदक्षता ,स्वच्छ भारत मिशनचा डांगोरा पिटणारे सीईओ जिल्हापरिषद अजित पवार दुर्घटनेत जिवितहानी झाल्यास जबाबदारी घेणार का?? :-डाॅ.गणेश ढवळे
_____
जीर्ण झालेल्या वर्ग खोल्यामुळे कधी आपत्ती कोसळेल,अपघात होईल याचा नेम नाही त्यामुळेच मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी यांचा जीव टांगणीला असतो.त्यामुळेच कर्तव्यदक्षतेचा व स्वच्छ भारत मिशन चा डांगोरा पिटणारे जिल्हापरिषद सीईओ अजित पवार पावसाळ्यात भविष्यात घडणा-या दुर्घटनेत जिवितहानी झाल्यास जबाबदारी घेणार का??
त्यामुळेच पावसाळ्यापुर्वीच जुन्या व पडझड होत असलेल्या वर्गखोल्यांची दुरूस्ती लवकर करण्यात येऊन शाळांची दर्जेदार ईमारत व वर्गखोल्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.