व्यावसायिकांना लुबाडणार्‍या वकिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे: (आशोक कुंभार )बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देऊन व्यावसायिकांना लुबाडणार्‍या वकिलावर बलात्काराचा (Rape Case) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे दुसर्‍यांबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवायला लावून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अ‍ॅड. विक्रम भाटे Adv. Vikram Bhate (वय ३४, रा. हडपसर) आणि वैभव शिंदे Vaibhav Shinde (वय ३४) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकांना अडकवून त्यांच्यावर बलात्कारची केस करण्याची धमकी देऊन अ‍ॅड. विक्रम भाटे याने १७ लाखांना लुबाडले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक  केली आहे. या व्यावसायिकाच्या ओळखीच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु. रजि. नं. २४८/२३) दिली आहे. हा प्रकार वाघोलीत जून २०२१ ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व वैभव शिंदे, अ‍ॅड. विक्रम भाटे हे ओळखीचे आहेत. ते फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी कोल्ड्रींकमध्ये काही तरी मिसळून त्यांना आग्रह करुन पिण्यास दिले. त्यानंतर दोघांनी आळीपाळीने तिच्याशी शारीरीक संबंध केला. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे नकळत व्हिडिओ चित्रण केले. ते फिर्यादीला दाखवून तिला दुसर्‍यासोबत शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचे चित्रण करुन त्या व्यावसायिकांना लुबाडले. हडपसरमधील व्यावसायिकालाही असेच हनी ट्रॅपमध्ये फसविण्यास फिर्यादीला सांगितले होते. परंतु, तिने तो ओळखीचा असल्याने नकार दिला.
तेव्हा दुसर्‍या तरुणीची भाटे याने मदत घेतली होती. भाटे व इतर अशा प्रकारे फसवणूक (Cheating Case)
करीत असल्याचे तिने या व्यावसायिकाला सांगितल्यावर त्याने पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी भाटे याला अटक केली. त्यानंतर आता या तरुणीनेही आपल्यावर बलात्कार केल्याची फिर्याद दिली असून
सहायक पोलीस निरीक्षक गोडसे (PSI Godse) तपास करीत आहेत.