बंगळूर:एका तरुणीला गाडीत ओढून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
बेंगळुरू: बेंगळुरूमध्येएका तरुणीवर चालत्या गाडीत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कोरमंगला पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. हा गुन्हा 25 मार्च रोजी घडला होता.
तरुणीच्या मित्राला धमकावून पळवून लावले : पोलिसांनी या प्रकरणी सतीश, विजय, श्रीधर आणि किरण या चार तरुणांना अटक केली आहे. रात्री दहाच्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र कोरमंगला येथील नॅशनल गेम्स पार्कमध्ये गप्पा मारत बसले होते. पोलिसांनी सांगितले की, तेथे आलेल्या या चौघांनी तरुणीच्या मित्राला धमकावून पळवून लावले. नंतर त्यांनी तिच्यावर जबरदस्ती करून तिला गाडीतून पळवून नेले.
चालत्या कारमध्ये बलात्कार : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तरुणीवर डोमालूर, इंदिरा नगर, आणेकल, नाइस रोडसह अनेक ठिकाणी चालत्या कारमध्ये बलात्कार झाला. रात्रभर भटकंती केल्यानंतर पहाटे 4 वाजता पीडित मुलीला तिच्या घराजवळील रस्त्यावर सोडण्यात आले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पीडितेने 26 मार्च रोजी कोरमंगला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या संदर्भात पुढील तपास करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची पार्श्वभूमी जाणून घेतली जात आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या : कोलकात्याच्या तिळजाला परिसरात एका सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणी योग्य ती कारवाई होत असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी अनेक वाहनांची तोडफोड करत जाळपोळ केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नागरिकांनी पोलिसांच्या तीन वाहनांची तोडफोड केली, तर एका वाहनाला आग लावण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या सुरक्षा दलाच्या ताफ्यावर देखील दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, आम्ही आंदोलक करणाऱ्यांशी बोलत असून सद्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.