चांदणी विद्यालयाच्या मुख्याधापक यांच्या कडून शिक्षण विभागाची फसवणुक

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

चांदणी विद्यालयाच्या मुख्याधापक यांच्या कडून शिक्षण विभागाची फसवणुक
शालेय पोषण अहाराचे मानधन उचलले पत्नीच्या नावे कारवाई कडे तालूक्याचे लक्ष

परंडा : ( सुरेश बागडे )आसू येथे चांदणी विद्यालयातील तात्कालीन मुख्याध्यापक यांनी पत्नीच्या नावाने स्वंयपाकी मदतनीस म्हणून बनावट कागदपत्रे दाखवून तब्बल १६ हजार ५०० रुपयांची उचल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एकीकडे शिक्षण विभागाचा कारभार पारदर्शक असल्याचे देखावा केला जात असताना त्यात हा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधार अशी म्हणण्याची वेळ आली आहे. या अपहारामुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील आसू येथील समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदणी विद्यालयातील तात्कालीन मुख्याध्यापक चंदणशिवे ए.एस. यांनी माहे ऑगस्ट/सप्टेंबर २०२० मध्ये ३ हजार रुपये, माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये प्रत्येकी १ हजार ५०० रुपये, माहे जानेवारी २०२१ मध्ये १ हजार ५०० रुपये, माहे फेब्रुवारी व मार्च २०२१ मध्ये ३ हजार रुपये आणि माहे जून,जुलै, ऑगस्ट २०२१ मध्ये ४ हजार ५०० रुपये असे एकूण १६ हजार ५०० रुपये स्वंयपाकी करार न करता तात्कालीन मुख्याध्यापक चंदणशिवे ए.एस. यांनी त्यांची पत्नी वंदना अस्तम चंदणशिवे यांच्या नावाने बोगस कागदपत्रे तयार करून माहे ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२१ या ११ महिन्या मध्ये प्रति महिना १५०० रूपये प्रमाणे मानधन उचलले. असे एकूण १६ हजार ५०० रूपयांचा अपहार केला आहे.मानधनाची रक्कम वंदना अस्तम चंदणशिवे यांच्या महाराष्ट्र बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे. तात्कालीन मुख्याध्यापक ए. एस.चंदनशिवे हे बार्शी तालूक्यातील रहिवासी असुन त्यांच्या पत्नीचे बॅंकखाते क्रमांक बार्शीचा आहे. अपहार करताना तात्कालीन मुख्याध्यापक यांना या प्रकरणात कोणी मदत केली का ? यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी तालुक्यात होत आहे .या प्रकरणी शिक्षण विभाग काय कारवाई करतात याकडे तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे .

.चांदणी विद्यालयाचा गट शिक्षण कार्यालयाकडे खुलासा…..
चांदणी विद्यालय यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, सन २०२०-२१ मध्ये चंदनशिवे ए.एस. हे मुख्याध्यापकपदी कार्यरत होते.या कालावधीत यांनी दिलेले पत्र किंवा माहिती यांचा अहवाल कार्यालयात नाही.शालेय अभिलेखा वरून लताबाई दादाराव होरे व सौदागर दादाराव होरे यांची शालेय समितीने ठराव क्रमांक ६३ दि. ०८ सप्टेंबर २००८ रोजी मदतनीस म्हणून नियुक्ती केलेली आहे.

चांदणी विद्यालय आसू येथील विद्यालयाच्या पोषण आहार वाटप मदतनीस यांचे सन २०२०-२१ चे मानधन वाटपा संदर्भातील अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

– अशोक खुळे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी परंडा.

शालेय पोषण अहार च्या मनधन वाटप प्रकरणी कागदपत्राची पुर्तता नसताना तत्कालीन मुख्यधापक चंदनशिवे यांच्या पत्नीच्या बॅक खात्यावर रक्कम जमा करन्यात आलीच कशी असा प्रश्न निर्माण झाला असुन मुख्यधापक यांनी गट शिक्षण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगणमत असल्याचे दिसत आहे . शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटने ची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करन्याची गरज आहे.