ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

सुषमा अंधारेंची महिला आयोगात धाव..


छत्रपती संभाजी नगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांच्यांवर अर्वाच्च भाषेत टिका केली होती.यावरु आता राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे.

‘शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला युवाकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. 26 मार्च २०२३ रोजी छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवर जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना वैचारिक पातळी सोडली होती. शिरसाट म्हणाले, ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत. पण काय काय लफडे केले तिने काय माहीत असं विधान त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. इतकचं नव्हे तर अंबादास दानवे यांच्याविषयी मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. अंबादास दानवेंनी मला फोन करुन ती बाई डोक्याच्यावर झाली असल्याचं त्यांनी सांगितलं, असा दावाही शिरसाट यांनी केला होता.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनीही शिरसाट यांच्या टिकेला उत्तरं दिलं. अंधारे म्हणाल्या, संजय शिरसाटां(Sanjay Shirsat)नी माझ्याबद्दल काहीतरी सवंग सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचे माध्यमांकडून समजले. इतरांच्या लेकीबाळीकडे आई किंवा बहिणीच्या नात्याने बघण्यासाठी अंगी शील पारमिता असावी लागते. सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाट यांच्या सारख्या लोकांकडे अशी शील पारमिता असण्याची सुतराम शक्यता नाही. अन् ज्याच्या ठायी शील पारमिता नाही, ती व्यक्ती बाबासाहेबांचा अनुयायी तरी असू शकते का? असा प्रश्न उरतोच असंही अंधारे यावेळी म्हणाल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button