विद्युत तार तुटून पडल्याने आगीत सात ट्रॅव्हल्स जळून खाक ..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


लातूर : ( आशोक कुंभार )
गॅरेजवर हायपाॅवरची विद्युत तार तुटून पडल्याने झालेल्या शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली

आगीत दुरुस्ती अन् रंगरंगाेटीसाठी आलेल्या सात ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी केवळ वाहनांचे सांगाडेच आढळून आले. ही घटना शुक्रवारी पहाटे २ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली लातुरातील कव्हा नाका-बाभळगाव नाकादरम्यान सिकंदरपूर चाैक परिसरात एका गॅरेजवर ट्रॅव्हल्स दुरुस्तीसाठी आणण्यात आल्या हाेत्या. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हायपाॅवरची विद्युत तार तुटल्याने शाॅर्टसर्किट झाल्याची माहिती समाेर आली आहे. यातून खाली उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सवर आगीच्या ठिणग्या पडल्या अन् आगीचा भडका उडाला. काही क्षणात आगीने राैद्ररूप धारण केले. यामध्ये उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या काही तासाच्या प्रयत्नानंतर आग आटाेक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, ताेपर्यंत ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या. यात काेट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.