रुई नालकोल येथिल अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने पळविले

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

रुई नालकोल येथिल अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने पळविले

आष्टी :अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथे घडली आहे. दरम्यान याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दिनांक 30/05/2022 रोजी संजय अर्जुन नन्नवरे वय 44 वर्षे रा.रुईनालकोल यांनी आष्टी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की मी रुई नालकोल या ठिकाणी माझी पत्नी नामे मिराबाई संजय नन्नवरे मुलगी प्रतिक्षा संजय नन्नवरे मुलगा महेश संजय नन्नवरे आम्ही वरील ठीकाणी राहतो व शेती करून उपजिवीका भागवतो. दिनांक 28/05/2022 रोजी आम्ही सकाळी जेवण करून घराबाहेर गेलो त्यानंतर माझा मुलगा हा सुद्धा जेवण करून घराबाहेर गेला व मुलगी व पत्नी ह्या दोघी घरीच होत्या मी गावामध्ये होतो माझा मुलगा महेश संजय नन्नवरे वय16 वर्षे , धंदा शिक्षण हा रूईनालकोल गावामधील वेशी जवळ थांबला होता त्याला पाहिले व मी घरी गेलो मी नंतर घरी गेल्यानंतर पत्नीला विचारले महेश घरी आला आहे की नाही. तर पत्नी ने सांगितले की तो घरी आला नाही मी इकड तिकडे पाहिले परंतु तो मला मुलगा महेश हा वेशी जवळ दिसला नाही त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तिने घेऊन गेला आहे. ती वेळ सकाळी 10.00 वाजणेची होती तरी दिनांक 28/5/2022 रोजी सकाळी 10.00वाजणेच्या सुमारास रुईनालकोल येथील वेशी जवळून माझा मुलगा महेश संजय नन्नवरे वय 16 वर्ष धंदा शिक्षण हा रुईनालकोल यास कोणीतरी अज्ञात व्यक्तिने घेवून गेला आहे याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात संजय नन्नवरे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब राख हे करीत आहेत