कपलची १२५ फूट खदानीवरून उडी मारत आत्महत्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : (अशोक कुंभार )शहरातील कांदिवली परिसरात एका जोडप्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. समता नगर भागात एका जोडप्याने सव्वाशे फूट उंच खदानीवरून उडी मारत आत्महत्या केली. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दोघेही आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे असून दोन महिन्यापूर्वी घरच्यांकडे त्यांनी लग्नाचा विषय मांडला होता मात्र कुटुंबाने त्याला विरोध केला.

कुटुंबाच्या विरोधामुळे नाराज झालेल्या या दोन्ही प्रेमी युगलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. वैशाली गोवारे (१५) आणि आकाश (२१) अशी मयतांची नावे असून याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणात पोलीस आणखी तपास करत आहेत.