महाराष्ट्र

राज्य सरकारने आता लेक लाडकी योजना नव्या सुरुपात सुरू करणार असल्याची घोषणा


मुंबई:(अशोक कुंभार ) शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रचं बजेट मांडण्यात आलं. या बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिलांच्या सशक्तीकरण आणि सबलिकरणासाठी सरकारने मोठे निर्णय घेतले.
काही घरांमध्ये अजूनही मुलगी नको अशीच भूमिका असते. मात्र सरकारने मुलींसाठी आता वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. तर राज्य सरकारने आता लेक लाडकी योजना नव्या सुरुपात सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

या योजनेंतर्गत पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये तर पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये सहावीत गेल्यानंतर 6000 रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. मुलगी 11 वीला गेल्यानंतर 8000 रुपये आणि 18 वर्षांची झाल्यावर 75000 रुपये मिळणार असल्याचं सांगितलं आहे. यासाठी कुठे आणि कसं रजिस्ट्रेशन करायचं याबाबत सरकारकडून लवकरच सूचना जारी केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. – राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत – चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार – महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर – कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर – मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना – महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण – माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे, दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना – शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती – अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना – या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा – या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button