समृद्धीवर महामार्गावर भीषण अपघात; महिला जागीच ठार!

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


वाशीम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर आज  सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास गुजरात वरून नागपूरकडे भरघाव वेगाने जानाऱ्या कारला क्रं जि.जे. २७ के.८२७१ समृद्धी महामार्गावर अपघात झाला या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर एक इसम गंभीर जखमी झाला आहे.

सदर घटना वाशीम जिल्ह्यात वनोजा फाट्यावर घडली आहे. वानोजा येथील ग्रामस्थ गोपाल पाटील राऊत व स्वप्नील चौधरी, बाबाराव अवगण, दिलीप अवगण यांनी तात्काळ १०८ वर फोन करून त्या गाडीतील अपघातग्रस्त रुग्णांना मदत केली. सदर ठिकाणी रूग्णवाहीका १ तास उशिरा पोचल्याने जखमीना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. सदर जखमीना पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले. सदर महामार्गावर वाहनचालक वेग मर्यादा ओलांडत आहेत. त्यामुळे अपघाताच्या संख्येत दर दिवशी वाढ होताना दिसत आहे. अपघातांमध्ये जखमीना तातडीने मदत मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, असे मत स्‍थानिकांतून व्यक्‍त केले जात आहे.