लग्न ठरेना, दोन सख्ख्या दिरांनी वहिनीसोबत केलं भयानक कृत्य,

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


राजस्थान:राजस्थानमधील जालौरच्या मोदरान गावामध्ये पोलीस ठाण्यापासून केवळ २०० मीटर अंतरावर दुहेरी हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन सख्ख्या दिरांनी आपल्या वहिनीची हत्या केली. तसेच वादात मध्ये पडलेल्या एका शेजाऱ्यालाही त्यांनी जिवे मारले. त्यानंतर या दोन्ही दिरांपैकी एकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

कौटुंबिक कलह आणि साखरपुड्याच्या विषयावरून झालेल्या वादानंतर दोन्ही दिरांनी कुऱ्हाडीने वार करून वहिनीची हत्या केली. या दरम्यान आरोपींनी १२ वर्षांच्या पुतण्यावरही कुऱ्हाडीने हल्ला केला. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रामसीन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रतनसिंह यांची पत्नी इंद्रा कंवर (४५) ह्या त्यांची मुलगी आणि मुलासह घरात होत्या. त्यावेळी त्यांचे सख्ख्ये दिर डुंगरसिंह आणि पहाडसिंह आपलं लग्न न झाल्याने आणि पुतणीचं (इंद्रा यांची मुलगी) साट्या लोट्यानं लग्न न केल्याने नाराज झाले होते. त्यावरून वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर दोघांनीही आपल्या सख्ख्या वहिनीवर कुऱ्हाडीने हल्ला केला.

या दरम्यान, शेजारी हरिसिंहने आरोपींना आईसमान असलेल्या वहिनीसोबत भांडू नका, असा सल्ला दिला. तेव्हा आरोपी त्याच्या मागे धावून गेले आणि कुऱ्हाडीने वार करून त्यांनी त्याची हत्या केली. यादरम्यान त्यांनी पुतण्यावरही वार केला. त्यानंतर आरोपींपैकी एकाने विषप्राषन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.