सिरसाळा येथे न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन 

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सिरसाळा येथे न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन 

परळी वैजनाथ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते सिरसाळा येथे नव्याने सुरू झालेल्या न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा शुभारंभ करण्यात आला. सिरसाळा व तालुक्यातील रूग्णांना हाँस्पीटलच्या माध्यमातून अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्याची सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे रूग्णांना चांगल्याप्रकारे उपचार सिरसाळा येथेच मिळू शकतात असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजयजी मुंडे यांनी उद्घाटन शुभारंभ प्रसंगी बोलतांना केले.
सिरसाळा येथे बी.एस.एन.एल टाँवरच्या बाजूला इदगाह चौकात रविवार दि.08 मे रोजी न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते भव्य शुभारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.टी.नाना देशमुख हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. गोविंद फड, जि.प.सदस्य प्रा.डॉ. मधुकर आघाव, पंचायत समितीचे सभापती बालाजी ऊर्फ पिंटू मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ, जि.प.सदस्य बालासाहेब किरवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली गडदे, पंचायत समितीचे सदस्य माऊली मुंडे, सरपंच सुंदर गित्ते, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, सुंदररराव सहकारी साखर कारखाना तेलगाव संचालक प्रभाकर पौळ, तपोवन मा.सरपंच चंद्रकांत कराड, सिरसाळा सरपंच रामदादा किरवले, उपसरपंच इम्रानखाँ पठाण, माजी सरपंच आक्रमखाँ पठाण, माजी सरपंच वैजनाथराव देशमुख,बीड जिल्हा रूग्णालय भुलतज्ञ एम.बी.बी.एस.डी.ए. डॉ.सय्यद अब्दुल शाफे, सिरसाळा वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ मुंडे, सिरसाळा हाजी शेख मैनुभाई , सिरसाळा डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ. भिमराव साळवे, सिरसाळा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष जनकराव कदम, भगवान पौळ, पैलवान माऊली मुंडे, भगवान कदम, मोहम्मद इनामदार, नगरसेवक आयुबखा पठाण वैद्यकीय, राजकीय, पत्रकार सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलची सुविधा आजपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलतांना ना.धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, आता मोठ्या शहरात उपचारासाठी जाण्याची गरज नाही. आता सर्व सोईयुक्त सेवा अशा ठिकाणी मिळणार आहेत. सिरसाळा व परिसरातील गोर गरीब रुग्णांसाठी अल्पदरात आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी ठेवत सिरसाळा येथे हॉस्पिटल सुरु केले आहे.तसेच सिरसाळा परिसरातील नागरिकांसाठी उपचारासाठी परळी, अंबाजोगाई, बीड, येथे जाण्याची गरज नसून प्रथमच एमबीबीएस, एमडी डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. यामुळे रूग्णांना फायदा होणार आहे.  या हाँस्पीटल मध्ये उपलब्ध सुविधा 24 तास आवश्यक सेवा, सुसज्ज बाह्यरुग्ण व आंतररूग्ण विभाग, उच्च रक्तदाब, मधुमेह उपचार, दमा उपचार, र्हदय रोग उपचार, गरोदर मतांची तपासणी, प्रसुती विभाग, ई.सी.जी. तपासणी, सेंट्रल आँक्सीजन, डिजिटल एक्स-रे, नेब्युलाइझर, स्पेशल रूम व सर्व सोयीनियुक्त जनरल वार्ड, मेडिकल स्टोअर (24 तास) उपलब्ध सुविधांचा लाभ रूग्णांना मिळणार आहे. अद्ययावत व विविध सोयीयुक्त हाँस्पीटल व मेडिकल नव्यानेच सिरसाळाकरांच्या सेवेत रुजू झाले. वैद्यकीय क्षेत्रात रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा असे ब्रीद मानून फुले जोपासना करण्याचे भाग्य मिळणार आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी, एम.बी.बी.एस.एमडी डॉ. शेख रेहान, सी.सी.वाय.एन.डॉ. सय्यद इरफान, फय्याज जानिमियाँ कुरेशी, जे.के.मेडिकल संचालक सिराज जानिमियाँ कुरेशी यांनी केले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद महाराज केंद्रे तर आभार पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी मानले.